घरी पोचले, की आई बघत असते ती मालिका (मराठीच असते ती) मी रोज बघते.
आवर्जून बघावं असं सहसा काही नसतंच त्यामुळं थोडा वेळ या मालिका चालतात. पण
एका मालिकेबाबत मात्र वेगळं घडलं.. एरवी मालिकांच्या वाट्याला मी फारशी
जात नाही, ऑफिसमुळं त्या बघायलाही मिळत नाहीत. पण का कोणास ठाऊक `जुळून येती रेशीमगाठी `..ही मालिका बघायला लागले. अर्थातच अनेक एपिसोड जातात. पण जे
मिळतात ते आवर्जून बघते.
काय आहे असं या मालिकेत?.. मलाही खरं तर हा प्रश्न पडतो. डायबेटीस होईल इतकी ही माणसं गोड वागतात. प्रसंगी हे याच ग्रहावरचे, खरे लोक आहेत ना असा प्रश्नही पडतो. तरीही या घरात (म्हणजे गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी यांनी रंगवलेल्या) काही तरी गंमत आहे. सध्या आपण समाजात जे miss करतोय ते काही तरी... थट्टामस्करी करणारं, अजीर्ण होईल इतकं गोड बोलणारं हे कुटुंब आत कुठंतरी खूप गंभीर आणि प्रामाणिकपणे, आज जवळ जवळ हद्दपार झालेली नैतिक मूल्यं, कौटुंबिक मूल्यं जपत असतं. राग, लोभ, मत्सर असं सगळं इथं आहे, पण त्या पलीकडे जाऊन कांकणभर अधिकच उरणारं परस्परांबद्दलचं प्रेम, काळजी, विश्वासही आहे. नाना-माई, नाना-अमित, नाना-माई-सून-मुलगी वगैरेंचे संवाद (अरुणा जोगळेकर) तर ऐकण्यासारखे आहेत. बिटवीन द लाइन्स असं खूप काही मिळतं. अर्थात, २० मिनिटांच्या भागात असे प्रसंग काही क्षणांपुरतेच असतात, पण worth म्हणावेत असे असतात.
पारंपरिक, भाबड्या प्रेक्षकांना हवा तो सर्व मसाला दिग्दर्शक हेमंत देवधर यांनी यात अगदी ठासून भरला आहे. मलाही माझी गंमत वाटली, अशी मालिका मला कशी आवडू शकते? पण आवडते.. ती यातील अशा या चुकार एक-दोन क्षणांसाठी.. वरवर बघणाऱया प्रेक्षकांना हवं ते दिग्दर्शकानं सगळं दिलं आहे, पण स्वतःला जे म्हणायचंय तेही तो त्या आडून पण ठामपणे म्हणतो.. चल मी तुला उपदेशाच्या चार गोष्टी सांगतो, असं न म्हणता.. आणि महत्त्वाचं म्हणजे, या मालिकेत जे वडीलधारे दाखवलेत ना, त्यांना बरंच समजतं. स्वतःला कपडे, दागिने किंवा कसलाच सेन्स नसलेल्या काल आलेल्या सुना (मख्ख चेहऱयानं पाठ केल्यासारखं) त्यांना अक्कल शिकवत नाहीत, चांगल्या-वाईटाचे धडे देत नाहीत.
कलावंत सगळे उत्तम. अपवाद मेघनाची भूमिका करणा-या नटीचा. चार दिवस उपाशी असल्यासारखा चेहरा आणि आवाज.. मख्ख चेहरा, आवाजात चढउतार नाही... वैताग आणते. असो. आता एकच इच्छा- ही मालिका होणार सून.. एवढी लोकप्रिय न होवो.. अन्यथा दिग्दर्शकाला काय म्हणायचंय, ते कळणारच नाही. कारण सगळी सूत्रं अन्यथा त्याच्याकडून कोण्या अज्ञाताकडं जातील आणि काहीही अगम्य, अतर्क्य बघावं लागेल. शेवटपर्यंत त्याला हवी त्याच पद्धतीनं ही मालिका आकार घेवो..
- ऋता बावडेकर.